देशातील पाच खासदार खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे संसदेत निवडणून गेलेत

 

देशातले किमान पाच खासदार जातीच्या खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे संसदेत निवडून गेले आहेत. त्यात एक केंद्रीय मंत्रीही आहे असा आरोप बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी केला आहे. बुधवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला. त्यांच्या या आरोपणानंतर देशातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे.

हे पाच खासदार कोण आहेत त्यांची नावेही त्यांनी सांगितली. ते म्हणाले की केंद्रीय मंत्री एस. पी. सिंह बघेल, जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामी (दोघेही भाजप), कॉंग्रेस खासदार मोहंमद सिद्दीकी, तृणमूल खासदार अपरूपा पोतद्दार आणि अपक्ष खासदार नवनीत राणा अशी त्यांची नावे असून हे पाचही खासदार खिट्या रामानपत्राच्या आधारे निवडणून आले आहेत,

ते म्हणाले की, देशातील दलितांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये ज्या जागा राखीव आहेत त्यातील किमान पंधरा ते वीस टक्के जागा अन्य जातीच्या लोकांनी खोटी प्रमाणपत्रे देऊन बळकावल्या आहेत. दलितांसाठी स्वतंत्र मतदार याद्या तयार करण्याची मागणीही त्यांनी केली. जीतनराम मांझी हे त्यांनीच स्थापन केलेल्या हिंदुस्तान अवामी मोर्चा या पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी पक्षाची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याची घोषणाही यावेळी केली. पक्षाची नवीन कार्यकारिणी लवकरच जाहीर केली जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली आहे.

Team Global News Marathi: