देशात 113 रुग्णांचा शनिवारी मृत्यू; रुग्णसंख्येत वाढ

कोरोनाची आकडेवारी आता फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस पुन्हा एकदा वाढताना दिसून येत आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये झालेली ही वाढ चिंताजनक मानली जात असून खबरदारी घेण्याचं आवाहन पुन्हा एकदा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्यात देखील कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घातलं आहे. प्रामुख्याने विदर्भात कोरोनाचा धुमाकूळ वाढलेला दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवरच कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाची तयारी सुरु आहे. तर आता खासगी रुग्णालयांमध्ये करोना प्रतिबंधक लस 250 रुपये प्रतिडोस प्रमाणे मिळू शकते, अशी माहिती राज्याचे आरोग्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली आहे.

भारत देशात गेल्या 24 तासांत 16,752 कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही 1,10,96,731 वर पोहोचली आहे. काल महाराष्ट्र राज्यात 11,718 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 1,07,75,169 वर पोहोचली आहे. काल देशात 113 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह देशातील आजवरच्या एकूण मृतांची संख्या ही 1,57,051 वर पोहोचली आहे. सध्या देशात कोरोनाचे 1,64,511 रुग्ण ऍक्टीव्ह आहे. भारतात गेल्या 16 जानेवारीपासून लसीकरण सुरु करण्यात आले आहे. आतापर्यंत भारतात 1,43,01,266 लोकांना लस देण्यात आली आहे. लवकरच भारतात दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणास सुरवात होणार आहे.

काल महाराष्ट्र राज्यात 8,623 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. या नव्या रुग्णसह राज्यातील आजवरची एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही 21,46,777 वर पोहोचली आहे. राज्यात काल 3,648 रुग्ण बरे झाले आहेत. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह राज्यातील आजवरची एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 20,20,951 वर पोहोचली आहे. राज्यात काल 51 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह राज्यातील आजवरच्या एकूण कोरोना मृतांची संख्या ही 52,092 वर पोहोचली आहे. सध्यघडीला राज्यात 72,530 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत.

Team Global News Marathi: