कोल्हापूर महानगर पालिका निवडणुकीच्या तारखा पुढे जाण्याची शक्यता ?

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूका आता एक महिना पुढे जाण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. नवी मुंबईमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे मतदार यादीच्या कार्यक्रमाची प्रक्रिया निवडणूक आयोगाने थांबविली आहे. त्यातच कोल्हापूर मनपाच्या मतदार यादीचा कार्यक्रम पूर्ण होईल मात्र प्रत्यक्षात निवडणूका होतील की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे.

मतदार यादीवरील हरकती निकालात काढण्याचे काम सध्या सुरू आहे. १२ मार्चला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर निवडणुकीच्या तारीखा जाहीर होईल, असे सांगितले जात होते. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक लागेल, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. नवी मुंबईसह, कोल्हापूर तसेच अन्य महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे राज्य शासन सतर्क झाले आहे.

निवडणुका म्हटले की प्रचारफेऱ्या, राजकीय सभा, त्यामुळे होणारी गर्दी आणि त्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास करायचे काय? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. ठाकरे सरकारने राजकीय तसेच धार्मिक कार्यक्रमांना काही दिवसांसाठी बंदी घातली आहे. निवडणुकीची तारीख जाहीर झाली म्हटले, की भागाभागांत धांदल सुरू होते. त्यातून कोरोना वाढेल, या भीतीपोटीच निवडणुका न घेण्याच्या पवित्र्यात निवडणूक आयोग आहे.

Team Global News Marathi: