बनावट नोटा छापणाऱ्या ३५ वर्षीय तरुणाला मुंबईतून अटक

बनावट नोटा छापणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने चेंबुर परिसरातून अटक केली आहे. डोक्यावर असलेले कर्ज फेडण्यासाठी त्यांनी नकली नोटा छापण्याचा फंडा वापरला होता. तसेच त्यांनी यूट्यूबच्या माध्यमातून नोटा छापण्याचे प्रशिक्षण घेतले होते.

मुंबईतील आरसीएफ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बनावट नोटा छापणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. फकीयान आयुब खान असे ३५ वर्षीय तरुणाचे नाव आहे. आरोपी तरुण कर्जबाजारी झाला होता. कर्ज फेडण्यासाठी त्याने बनावट नोटा छापण्याचे काम सुरू केले होते.

अधिक तपास करता त्याच्या घरातून प्रिंटर शाई आणि नोटा छापण्यासाठी लागणारा कागद हस्तगत करण्यात आला. तो ५००, २००, ५० रुपयांच्या नोटा छापत असे. फकीयानने यूट्यूबवरुन नोटा छापण्याचे प्रशिक्षण घेतले होते. मात्र यामागे आणखी कोण कोण आहे आणि त्याने आतापर्यंत किती नोटा बाजारात आणल्या आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत.

Team Global News Marathi: