नगरसेवक संख्या वाढणार, ठाकरे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

 

 

मुंबई | बहुसदस्यीय प्रभाग पद्धत लागू केल्यावर मुंबई महापालिका वगळता अन्य महानगरपालिका आणि नगरपालिकांमधील नगरसेवकांच्या सदस्य संख्येत १५ टक्के वाढ होणार आहे अशा हालचाली ठाकरे सरकारने सुरु केल्या आहेत. येत्या आठवड्यात होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नगरसेवकांची संख्या वाढविण्याचा निर्णय होण्याची चिन्हे आहेत. महापालिका निवडणुका आता तोंडावर आहेत, त्यापूर्वी ठाकरे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

.

राज्यात मुंबईसह सध्या २७ महापालिका आणि ३७९ नगरपालिका- नगरपंचायती आहेत. दर १० वर्षांनी होणाऱ्या जनगणनेच्या आधारे नगरविकास विभागातर्फे महापालिका- नगरपालिकांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात सदस्य संख्या निश्चित केली जाते. त्यानुसार राज्य निवडणूक आयोग त्या शहरासाठी प्रभाग रचना करून त्याप्रमाणे निवडणुका पार पाडते.

समोर आलेल्या माहितीनुसार सध्या सन २०११ च्या जनगणनेनुसार नगरपालिकांमध्ये किमान १६ तर जास्तीत जास्त ६५ सदस्य संख्या आहे. तर महापालिकांध्ये किमान ६५ तर जास्तीत जास्त १७५ पर्यंत आहे. मुंबई महापालिके त ही संख्या २२७ आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे देशात सन २०११ ची जणगणना अद्याप सुरु होऊ शकलेली नाही. पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चदरम्यान १५ महापालिकांच्या तसेच सुमारे १०० हून अधिक नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत.

Team Global News Marathi: