गोव्यात अभिनेत्री वर्षा उसगावकर करणार TMC मध्ये एन्ट्री!

 

गोवा विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आत गोविले विधनसाभ निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबंदी सुरु केली आहे. त्यात शिवसेना, तृणमूल कॉग्रेस आणि आम आदमी पक्षाने सुद्धा गोव्याच्या राजकारणात उडी घेतली आहे. आता त्या पाठोपाठ मराठी आणि हिंदी सिने-सृष्टीत आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री वर्षा उसगावकर ह्या सुद्धा गोव्याच्या राजकानात प्रवेश करणार आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर राष्ट्रीय पातळीवर तृणमूल काँग्रेसची लोकप्रियता वाढली आहे. टीएमसीने त्रिपुरा, गोवा, मेघालय, आसाम आणि यूपीमध्ये आपला विस्तार सुरु केला आहे. यूपीमधील काँग्रेसचे माजी नेते ललितेशपती त्रिपाठी यांनी सोमवारी टीएमसीमध्ये प्रवेश केला. यापूर्वी आसाम काँग्रेसच्या माजी नेत्या सुष्मिता देव यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि त्यांना राज्यसभा खासदारपद देण्यात आले आहे.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गुरुवारी गोव्याला जात आहेत. केवळ बॉलीवूड अभिनेत्री वर्षा उसगावकरच नाही तर लकी अली आणि नफिसा अली सारखे बॉलिवूड स्टार देखील टीएमसीमध्ये सामील होऊ शकतात. टीएमसीचे राज्यसभेचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी यात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे मानले जाते. निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर देखील टीएमसीच्या विस्तारात महत्वाची भूमिका बजावत आहेत.

Team Global News Marathi: