पुण्यात कोरोनाचा उद्रेक : पुणे शहरात बुधवारी पुन्हा कोरोनाबाधितांचा आकडा साडेचार हजारावर

पुण्यात कोरोनाचा उद्रेक : पुणे शहरात बुधवारी पुन्हा कोरोनाबाधितांचा आकडा साडेचार हजारावर

ग्लोबल न्यूज : पुणे शहरातील गेली दोन दिवस अडीच-साडेतीन हजारापर्यंत आलेली कोरोनाबाधितांची वाढ बुधवारी पुन्हा साडेचार हजाराच्या जवळ पोहचली आहे. आज ४ हजार ४५८ नवे रूग्ण आढळून आले असून, दिवसभरात १६ हजार ४४६ जणांची तपासणी करण्यात आली आहे़ तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही २७.१० टक्के इतकी आहे.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रूग्णालयांमध्ये ३ हजार १८८ जणांवर आॅक्सिजनसह उपचार सुरू आहेत. तर ७९९ रूग्ण हे गंभीर आहेत. तर दुसरीकडे ३ हजार ३७४ कोरोनाबाधितही आज कोरोनामुक्त झाले आहेत.आज दिवसभरात ४३ जणांचा मृत्यू झाला आहे़ यापैकी ११ जण पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील सक्रिय रूग्णसंख्या ही ३३ हजार ८५८ इतकी झाली आहे.

शहरात आजपर्यंत १५ लाख ३० हजार ३५ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी २ लाख ६९ हजार ३४३ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी २ लाख ३० हजार १८३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील एकूण मृत्यूची संख्या ५ हजार ३०२ इतकी झाली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: