सोलापूर ग्रामीण मध्ये कोरोनाचा वाढता कहर थांबेना; 45 मृत्यू अन 1889 बधितांची भर

सोलापूर: सोलापूर शहरातील कोरोना बधितांची आकडेवारी कमी झाली असली तरी सोलापूर ग्रामीण भागात मात्र कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे.आज दि.8 मेच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 1889 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे.

आज शनिवारी 8 मे रोजी ग्रामीण भागातील 1889 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 1156 पुरुष तर 733 महिलांचा समावेश होतो.

आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 1593 आहे. यामध्ये 960 पुरुष तर 633 महिलांचा समावेश होतो. आज 45 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज एकूण 6529 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 4640 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: