कोरोना लसीचा तिसरा डोसही घ्यायला हवा, मी स्वत: घेतला, सायरस पुनावाला यांची माहिती |

 

पुणे | कोव्हिशील्ड लस घेतल्यानंतर सहा महिन्यांनी शरीरातील अॅन्टीबॉडीज कमी होतात असा रिपोर्ट समोर आला होता ते खरं आहे. त्यामुळेच तिसरा बुस्टर डोस घ्यायला हवा. मी स्वतः तिसरा बुस्टर डोस घेतला आहे असं वक्तव्य सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष सायरस पूनावाला यांनी केलं आहे.

सायरस पूनावाला यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर सुद्धा निशाणा साधला होता. लसीच्या किमतीत बदल झाल्याने सीरमचा नफा मोठ्या प्रमाणात बुडाला, पण भारतातील लोकांना लस मिळावी यासाठी आम्ही तो सहन केला. सीरमची लस ही जगातील सर्वांत स्वस्त आहे, असं पूनावाला म्हणालेत.

केंद्र सरकारने लस परदेशात पाठवायला बंदी घालून अतिशय वाईट गोष्ट केली आहे. माझा मुलगा मला म्हणाला की यावर बोलू नको, पण मी बोलणार आहे. कारण सिरम इन्स्टिट्यूट अनेक वर्षांपासून जगातील 170 देशांना लस पुरवते. पण आता त्यांना गरज असताना त्यांना लस देता येत नाही. या देशांनी लसीसाठी आधीच पैसै दिले आहेत असे विधान सायरस पुनावाला यांनी केले होते.

Team Global News Marathi: