औरंगाबादेत कोरोना कारवाईत, भाजपा नेत्याच्या समोर मनपा कर्मचाऱ्यांना व्यापाऱ्यांकडून बेदम मारहाण

औरंगाबाद : औरंगरंगाबाद शहरात पुन्हा एकदा कोरोनाच रुग्ण वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ही वाढत असलेली कोरोना रुग्णसंख्या स्थानिक प्रशासनाच्या अडचणी वाढवताना दिसत आहेत. तर दुसरीकडे कोरोनाला आळा घालण्याची पाळक ठेवणाऱ्या मनपा कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण झल्याचा प्रकार समोर आला आहे. भाजप नेत्यांच्या उपस्थितीत गुलमंडीवरील व्यापाऱ्यांनी महापालिकेच्या पथकाला सोमवारी सकाळी मारहाण केली.

गुलमंडीवर मास्क नसलेल्या एका विद्यार्थीकडून मनपा कर्मचारी नियमानुसार दंडवसुली करत असताना गुलमंडीवरील व्यापाऱ्यांनी या पथकातील कर्मचाऱ्यांनाच मारहाण केली. गुलमंडीवर विनामास्क नागरिकांवर कारवाई सुरू असताना पथकाने एका विद्यार्थ्याला अडवले. विद्यार्थ्याने मास्क घातलेला नव्हता. तेथे उपस्थित असलेले भाजपचे माजी नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी यांनी पथकाच्या कारवाईत हस्तक्षेप करत त्या विनामास्क विद्यार्थ्याला सोडून द्या, असे पथकाला बजावले.

मात्र मनपा पथकाने नियमानुसार दंड आकारावाच लागेल, असे सांगितले. त्यानंतर माजी आमदार किशनचंद तनवाणीही तेथे आले. त्यांनीही त्या विनामास्क विद्यार्थ्याला सोडून देण्यास सांगितले. परंतु विनामास्क आढळल्यास दंड आकारण्याचे आदेश असल्याचे सांगत पथकातील कर्मचारी दंडवसुलीवर ठाम राहिले.

विनामास्क विद्यार्थ्याकडून दंडवसुलीचे निमित्त गुलमंडीवरील व्यापाऱ्यांना मिळाले. दुकानात कॅरिबॅग ठेवल्यामुळे मनपा पथकाकडून काही दिवसांपूर्वी आकारलेल्या दंडाचा राग त्यांनी या पथकावर काढला आणि पथकाला बेदम मारहाण केली. ही मारहाण होत असताना सुरेंद्र कुलकर्णी आणि किशनचंद तणवाणीही तेथेच होते. या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Team Global News Marathi: