अफगाणिस्तानातून अमेरिकेन सैन्याने गाशा गुंडाळला; शेवटचा सैनिक मायदेशी रवाना होतानाचे छायाचित्र व्हायरल

काबुल : अमेरिकेने अफगाणिस्तानातून आपला गाशा गुंडाळला असून शेवटचा सैनिक मायदेशी रवाना होत असल्याचे छायाचित्र व्हायरल झाले आहे.
American troops Withdrawal from Afghanistan; Photo of last soldier leaving for home goes viral

जागतिक व्यापार संघटनेच्या इमारतीला विमानांनी लक्ष करून दहशतवाद्यांनी टोलेजंग टॉवर २००१ मध्ये जमीनदोस्त केले होते. या घटनेची ९/११ अशी ओळख होती. त्यानंतर अल कायदा, तालिबानी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी अफगाणिस्तानात गेली २० वर्ष अमेरिकेने मोहीम उघडली होती. यानंतर ही मोहीम अमेरिकेने आता ३१ ऑगस्ट रोजी थांबवली आहे. या अंतर्गत अमेरिकने अफगाणिस्तानातून ३० ऑगस्ट रोजी आपले सर्व सैन्य माघारी घेतल्याची अधिकृत घोषणा करून शेवटचा सैनिक मायदेशी परतत असल्याचे एक छायाचित्र प्रसिद्ध केले आहे.

अफगाण भूमीवर असलेले अमेरिकन सैन्याचे एकमेव राहिलेले चिनोक हेलिकॉप्टर हे ग्लोबमास्टर सी १७ या विमानात चढवण्यात आले आणि विमानाने हवेत उड्डाण केल्याने अमेरिकेची मोहीम संपल्याचे स्पष्ट झाले.

राष्ट्रपती जो बायडेन यांनी सैन्याला माघारी परतण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर लष्करी साहित्य आणि सैनिक विमानातून पाठविण्याची मोहीम काही दिवस सुरु होती. हजारो सैनिकांच्या तुकड्या आणि १० हजारावर अफगाणी नागरिकांनी स्थलांतर केले आहे.

यूएस सेंट्रल कमांडचे प्रमुख जनरल फ्रँक मॅकेन्झी म्हणाले की, काबूल विमानतळावरून दुपारी ३.२९ वाजता शेवटचे विमान उडाले ते म्हणाले की, ‘खूप कमी अमेरिकन नागरिक मागे राहिले आहेत आणि ते लवकरच देश सोडू शकतील.

ग्लोबल न्युज नेटवर्क: