कोरोना काळात गुजरात, उत्तर प्रदेशसारखी स्थिती महाराष्ट्रात झाली नाही

 

मुंबई | राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना परिस्थितीवरून ठकरे सरकारचे वाभाडे काढत जोरदार टीका केली होती. फडणवीस यांच्या प्रत्येक आरोपांवर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी उत्तर दिलं आहे. कोरोना काळात गुजरात, उत्तर प्रदेशसारखी स्थिती महाराष्ट्रात झाली नाही, असा टोला नवाब मलिक यांनी फडणवीस यांना नाव न घेता लगावला आहे.

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारच्या कामकाजाचा लेखाजोखा सादर करतानाच विरोधकांच्या आरोपांचंही खंडन केलं आहे. कोरोना काळात महाराष्ट्र सर्वात जास्त प्रभावी राज्य होतं. राज्यात सुरुवातील एकच लॅब होती. देशाने किंवा केंद्राने निर्णय घेण्याआधी महाविकास आघाडीने कोरोना संसर्गाला गंभीरपणे घेतलं. त्यामुळे ६५ लाख लोक प्रभावीत झाले होते. मृत्यूही झाले. पण उत्तर प्रदेश, गुजरात, बिहार आणि मध्येप्रदेशात जी परिस्थिती झाली ती महाराष्ट्रात झाली नाही, असं मलिक यांनी सांगितलं.

गुजरातमध्ये मृत्यूचा आकडा लपवण्यात आला. उत्तर प्रदेशात गंगेत मृतदेह सोडण्यात आले. कानपूरमध्ये मृतदेह दफन करण्यात आले. इतर राज्यात ऑक्सिजनशिवाय मृत्यू झाले. गुजरात, उत्तर प्रदेशसारखी परिस्थिती महाराष्ट्रात झाली नाही, असं त्यांनी सांगितलं. तसेच दोन वर्ष होऊनही गाजावाजा होत नाही असे प्रश्न विचारले जात आहे. पण काम अधिक आणि गाजावाजा कमी असं धोरण आम्ही स्वीकारलं आहे असा टोला सुद्धा त्यांनी लगावला होता.

Team Global News Marathi: