मोठी बातमी | मुंबईतील शाळा येत्या १५ डिसेंबरला सुरु होणार |

 

मुंबई | ओमिक्रॉनचं संकट लक्षात घेता मुंबई महापालिकेनं कार्यक्षेत्रातील शाळा १५ डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. आता मुंबईत पहिली ते सातवीच्या शाळा आता १५ डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिली ते सातवीच्या शाळा १ डिसेंबरपासून शाळा सुरु होणार नाहीत.

आता मुंबई महापालिकेनं शाळा १५ डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं तयारी सुरु केली आहे. मुंबईतील पालक देखील शाळा सुरु करण्यासंदर्भात तयार नव्हते. त्यामुळं मुंबई महापालिकेनं शाळा सुरु करण्याचा निर्णय आणखी १५ दिवस लांबणीवर टाकला आहे. या निर्णयामुळे पुन्हा एकदा विध्यार्थी आणि पालकवर्गाची हिरमोड झाला आहे.

तसेच नाशिकमध्ये सुद्धा महाराष्ट्र सरकारच्या शालेय शिक्षण विभागानं शासन निर्णयात जारी केलेल्या नियमावलीचं पालन होत नाही तोपर्यंत शाळा सुरु करणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. नाशिकमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय १० डिसेंबरनंतर घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.

Team Global News Marathi: