पवार-शहांची का झाली माहीत नाही, मात्र अमित शहा यांनी बोलण्यातून संकेत दिले आहे – चंद्रकांत  पाटील

पुणे : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात अहमदाबाद येथे गुप्तभेट झाल्याचे वृत्त काल समोर आले होते. या भेटीवेळी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल सुद्धा शरद पवार यांच्या सोबत उपस्थित होते. तसेच भाजपचे नेते सुद्धा उपस्थित होते अशी माहिती समोर आली आहे.

दिव्य भास्करच्या बातमीनुसार, पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे काही निवडक ज्येष्ठ नेते शुक्रवारी संध्याकाळी खासगी जेट विमानाने अहमदाबाद येथे गेले होते. त्यानंतर बंद दाराआड पवार, शहा आणि पटेल यांच्यात गुप्त बैठक झाली. तब्बल दोन तास ही बैठक सुरू होती. पण त्यात नक्की कोणत्या विषयावर चर्चा झाली ते मात्र कळू शकलेले नाही.

मात्र यावर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट झाली नाही मला माहीत नाही. परंतु अमित शहा यांच्या बोलण्यातून तसे संकेत मिळत आहेत. भेट झाली नसती तर भेट झाली नाही, असं ते म्हणाले असते. पवार आणि शहा यांची एवढी निवांत भेट का झाली, हे मला माहीत नाही. त्यांच्यात काय राजकीय चर्चा झाली हे सुद्धा मला माहीत नाही, असंही ते म्हणाले.

पुढे बोलताना पाटील म्हणाले की, भारतीय संस्कृतीत अशा भेटी होतच असतात. या भेटींना राजकारणाच्या पलिकडे पाहिलं पाहिजे. महाराष्ट्रात गेल्या दीड वर्षापासून हे चित्रं कमी झालं आहे. विरोधी पक्ष म्हणजे दुश्मनच असं चित्रं निर्माण झालं आहे. परंतु, काही असलं तरी राजकीय भेटी घेण्यात काही वावगं नाही, असंही ते म्हणाले.

Team Global News Marathi: