कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं वाढवली मुंबईची चिंता, पालिकेची आज महत्त्वाची बैठक

 

मुंबई | एकीकडे कोरोनाच्या संसर्ग राज्यात कमी होत असताना आता पुन्हा एकदा राज्याबरोबर मुंबईकरांचे टेंशन वाढवणारी बातमी समोर येत आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट ओमिक्रॉननंआता मुंबईचीही चिंता वाढवली आहे. त्यातच आता मुंबईतही या व्हेरिएंटचा सामना करण्यासाठी आधीपासून पावलं उचलण्यास सुरुवात झाली आहे. आज नव्या स्ट्रेनबाबत चर्चा आणि पुढील नियोजन कण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाची महत्वाची बैठक पार पडणार आहे.

समोर आलेल्या महतीनुसार आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट ओमिक्रॉनने जगभरात चिंता वाढवली आहे. जगातले देश सतर्क झाले आहेत. कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटचा संसर्ग होऊ नये यासाठी कडक पावले उचलली जात असल्याचं चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातही सरकार सतर्क झालं आहे. त्यामुळे या व्हायरसच्या नव्या व्हेरिएंटचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी राज्य सरकारही सतर्क झाली आहे.

पालिकेच्या या बैठकीत नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरता काही महत्वाची पावलं उचलण्याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर मुंबई महापालिका प्रशासनाकडून बारीक नजर ठेवली जाण्यावर भर दिला असल्याचं समजतंय. आज संध्याकाळी ५.३० वाजता ऑनलाईन पद्धतीनं महापालिका आयुक्त ही बैठक घेणार आहेत. या बैठकीला सर्व कोविड हॉस्पिटलचे डिन,टास्क फोर्स सदस्य, अतिरीक्त आयुक्त, वॉर्ड ऑफिसर, आरोग्य अधिकारी उपस्थित राहणार आहेत. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे मुंबईचीही चिंता वाढली आहे

Team Global News Marathi: