वोडाफोन-आयडिया नंतर एयरटेल रिचार्ज’ही महागला, जाणून घ्या नवे दर |

 

नवी दिल्ली | टेलिकॉम कंपनी एरटेल’चे रिचार्ज प्लॅन २६ नोव्हेंबरपासून महागले आहेत. वोडाफोन-आयडिया’चे रिचार्ज वाढल्यानंतर एरटेल’नेही दरात वाढ केली आहे. नव्या टॅरिफ प्लॅननुसार, एरटेल’चा सर्वात स्वस्त ७९ रुपयांचा प्लॅन आता ९९ रुपये झाला आहे. या प्लॅनची वैधता २८ दिवस आहे. या प्लॅनमध्ये २०० MB डेटा आणि 1 पैसा प्रति सेकंद कॉलिंगची सुविधा मिळेल. एरटेल १४९ चा प्लॅन आता १७९ रुपये झाला आहे.

तसेच २१९ रुपयांचा प्लॅन २६५ रुपये झाला आहे. २४९ रुपयांचा रिचार्ज २९९ आणि २९८ रुपयांचा प्रीपेड प्लॅन ३५९ रुपयांत मिळेल. एरटेलचा सर्वात पॉप्युलर ५९८ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनसाठी आता ७१९ रुपये खर्च करावे लागणार आहेत. ८४ दिवस वॅलिडिटी असणाऱ्या एयरटेल प्रीपेड प्लॅनची किंमत आता कमीत-कमी ४५५ रुपये होईल.

५९८ रुपयांचा रिचार्ज प्लॅन ७१९ रुपये आणि ६९८ रुपयांच्या प्लॅनची किंमत ८३९ रुपये झाली आहे. एरटेल’ने वार्षिक प्रीपेड प्लॅनचे दरही वाढवले आहेत. ३६५ दिवसांची वॅलिडिटी असणारा १,४९८ रुपयांचा प्रीपेड प्लान आता १,७९९ रुपये झाला आहे. तर २,४९८ रुपयांचा प्लॅन २,९९९ रुपये झाला आहे. वोडाफोन आयडिया रिचार्ज प्लॅनही महागले – वोडाफोन आयडिया ने २५ नोव्हेंबरपासून सर्व प्रीपेड प्लॅनमध्ये २५ टक्क्यांची वाढ केली आहे. या वाढीनंतर वोडाफोन आयडिया ग्राहकांना जवळपास २५ टक्के अधिक पैसे खर्च करावे लागणार आहेत.

Team Global News Marathi: