कोरोनाचा मोर्चा आता ग्रामीण भागात: 212जणांचे अहवाल पॉझिटिव्ह सर्वाधिक रुग्ण बार्शी अन अक्कलकोट तालुक्यात

सोलापूर : ग्रामीणमधील ज्येष्ठ नागरिक व गंभीर आजार असलेल्यांसह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्‍तींची कोरोना ऍन्टीजेन टेस्ट करण्यावर आरोग्य विभागाने भर दिला आहे. शुक्रवारी (ता. 17) 979 संशयितांच्या अहवालापैकी 212 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये बार्शी तालुक्‍यात तब्बल 109 तर अक्‍कलकोट तालुक्‍यात 64 रुग्ण सापडले आहेत.

शहर-जिल्ह्यात आता दररोज सरासरी दोन हजार व्यक्‍तींची ऍन्टीजेन टेस्ट केली जाणार आहे. ऍन्टीजेन टेस्ट केली जात असल्याने दिवसेंदिवस सोलापूर शहर व ग्रामीणमधील रुग्णसंख्येत मोठी वाढ होऊ लागली आहे. त्याचा पहिलाच झटका शुक्रवारी बसला. अक्‍कलकोट तालुक्‍यात 64, बार्शी तालुक्‍यात 106, करमाळ्यात तीन, माढ्यात पाच, माळशिरसमध्ये दोन, मोहोळमध्ये 11, उत्तर सोलापुरात पाच, पंढरपूर तालुक्‍यात सहा आणि दक्षिण सोलापूर तालुक्‍यात सात रुग्ण सापडले आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: