मातोश्रीवर कोरोनाची धडक; पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना कोरोनाची लागण

ग्लोबल न्यूज: राज्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. सरकारमधील मंत्री व अधिकारी पॉझिटिव्ह येत आहेत. शनिवारीराज्याचे पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे.

आपल्या ट्वीटमध्ये त्यांनी कोविड पॉझिटिव्ह झाल्याचं सांगत, सर्वांनी मास्क घालून योग्य ती काळजी घेण्याचं आवाहनही केलं आहे. तसंच त्यांच्या संपर्कात आलेल्यांनाही काळजी घेण्याचं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

 

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: