पालकमंत्री अस्लम शेख यांच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण तिघांना अटक

कॅबिनेट आणि पालकमंत्री अस्लम शेख यांच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी तिघा जणांना अटक करण्यात आलेली आहे या अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एका महिलेचा सुद्धा समावेश आहे. रविवारी मंत्री अस्लम शेख एका कार्यक्रमानिमित्त अंधेरी येथे आले होते. त्यांचा ताफा ज्या रस्त्याने जाणार होता. त्या रस्त्यात एका दुचाकी उभी होती.

मात्र या दुचाकीमुळे तेथून जाणाऱ्या ताफ्याला अडचण येत होती. त्यामुळे रस्त्यात उभी असलेली दुचारी सुरक्षा रक्षक दिगंबर पानसरे बाजूला काढण्यासासाठी आलेले असताना त्यांची तीन लोकांसोबत शाब्दिक बाचाबाची झाली. वाद इतका वाढला की तिघांनी मिळून दिगंबर यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ सुरु केली. तसेच जबर मारहाण सुद्धा केली होती

या संदर्भात पोलिसांनी माहिती दिली की, बॉडीगार्ड दिगंबर यांच्यासोबत धक्काबुक्की-शिवीगाळ करणाऱ्या आरोपींमध्ये एक महिलाही होती. या घटनेनंतर दिगंबर यांचा जबाब नोंदवण्यात आला आणि त्याआधारे पोलिसांनी तीन जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. दिगंबर हे पोलिस कॉन्स्टेबल असून ते मुंबई पोलिस दलात कार्यरत आहे.

Team Global News Marathi: