कोरोना गेला असं समजणाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा

 

राज्यात कोरोनाच्या अप्र्श्वभूमीवर काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली असली तरी अद्याप तिसऱ्या लाटेचा धोका गेलेला नाही आहेत. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नागरिकांना गंभीर इशारा दिला आहे. ‘करोना वगैरे सगळं संपलंय असा गोड गैरसमज काही लोकांनी करून घेतला आहे. मुख्यमंत्री वारंवार आवाहन करत असतात तरी लोक ऐकत नाहीत. त्यातही राजकारण केलं जातं. असं करून पुन्हा सगळं काही बंद करण्याची वेळ सरकारवर आणू नका,’ असा इशाराअजित पवार यांनी आज दिला.

ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ग्रामीण भागात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याकडं पत्रकारांनी अजित पवारांचं लक्ष वेधलं. अजित पवारांनीही ते मान्य केलं. ‘करोना रुग्णसंख्या वाढीच्या बाबतीत केरळनंतर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे, हे केंद्र सरकारनंही सांगितलंय.

पुढे अजित पवारांनी सर्वांना काळजी घ्यायला सांगितलं आहे. दुर्दैवानं महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात लोकांना भीतीच राहिलेली नाही. मास्क घातले जात नाहीत. शारीरिक अंतर पाळलं जात नाही. सुरक्षेच्या दृष्टीनं जे काही नियम पाळायला हवेत, ते पाळले जात नाहीत. करोना गेलाय अशा प्रकारचा एक गोड गैरसमज काही लोकांनी करून घेतलाय. त्यामुळं ही संख्या वाढलीय असं अजित पवार म्हणाले.

Team Global News Marathi: