व्यंगचित्राच्या माध्यमातून अण्णा हजारेंना राष्ट्र्वादीने लगावला टोला

 

पुणे | एकीकडे राज्यातील बंद मंदीराच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारला आंदोलनाचा इशारा देणारे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे मात्र वाढत्या महागाई विरोधात केंद्र सरकार विरोधात एकही शब्द न बोलताना अनेकदा दिसून आले आहेत. त्यामुळे आता थेट राष्ट्र्वादीने आण्णा हजारे यांना चिमटा काढला आहे. एकीकडे आण्णा हजारे मंदिरे उघडण्यासाठी आंदोलनाचा इशारा देत असताना दुसरीकडे मात्र वाढत्या महागाई विरोधात काहीही न बोलताना दिसून आले आहेत.

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी अण्णांवर टीका केली आहे. त्यांनी अण्णावर टीका करताना एक व्यंगचित्र प्रसिद्ध केलंय. क्लाईड क्रास्टो यांनी स्वत: हे व्यंगचित्र काढल्याचं त्यांनी म्हटलंय. या व्यंगचित्रात एक पेट्रोल पंप दाखवण्यात आला आहे. तो पेट्रोल पंप म्हणतो अण्णा गुड माॅर्निंग, तर गॅस सिलेंडर म्हणतो आमच्यासाठी आंदोलन कधी?, असं खास व्यंगचित्र क्लाईड क्रास्टो यांनी शेअर केलं आहे.

राज्यातील मंदिरं उघडी करण्यासाठी सरकार काहीचं का करत नाही. सरकार दुसऱ्या सगळ्या गोष्टींना परवानगी देत आहे. पण सरकारला मंदिर का उघडावी असं वाटत नाहीत? असा सवाल अण्णांनी सरकारला केला होता. देशात एवढी महागाई वाढली आहे. यावर अण्णा काहीचं बोलले नाहीत. तेव्हा अण्णा कुठे गेेले होते ?, असा सवाल देखील क्लाईड क्रास्टो यांनी विचारला आहे.

Team Global News Marathi: