कोरोना काळात लग्नाला जाताय मग ही बातमी वाचाच ..

आता विवाह मूहूर्त असल्याने लॉकडाऊनच्या काळात पुढे ढकलण्यात आलेल्या विवाहसोहळ्यांची लगबग सुरू झाली आहे. कोरोनाचे निर्देश पाळून विवाहसोहळे आयोजित करण्यात येत आहेत. विवाह सोहळ्यांमुळे कोरोना झपाट्याने फैलावण्याची शक्यता आहे. तसेच हिवाळ्यात कोरोनाचा फैलाव वाढण्याचा इशारा संशोधकांनी याआधीच दिला आहे. विवाह सोहळ्यात योग्य ती काळजी घेतल्यास कोरोनापासून बचावास मदत होणार आहे.

बंद किंवा एसी हॉलमध्ये होणाऱ्या विवाह सोहळ्यांमुळे कोरोना संक्रमणाचा धोका जास्त असतो. त्यामुळे लग्नासाठी हॉलची निवड करताना खेळती हवा असलेल्या हॉलची निवड करावी. बंदिस्त किंवा एसी हॉल घेणे टाळावे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. विवाह सोहळा किंवा एखादा समारंभ खुल्या जागेत किंवा मैदानात आयोजित करण्यास प्राधान्य द्यावे.

विवाह सोहळे किंवा समारंभासाठी हॉलच्या व्यवस्थापकांनी हाय एफिशियन्सी प्रर्टिक्यूलेट एअर (एचईपीए) सुविधा पुरवण्याकडे लक्ष द्यावे. ही सुविधा 99 टक्के हवेचे शुद्धीकरण करून कोरोनाचा फैलावाचा धोका कमी करते. त्यामुळे ही सुविधा हॉलच्या व्यवस्थापकांनी पुरवावी, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

विवाह समारंभात खाण्यापिण्याच्या गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कोरोना विषाणू पृष्ठभागावर जास्तवेळ अॅक्टिव्ह असल्याने या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे. सलाद, फळे, दही, कच्चे पनीर, कच्च्या भाज्या याचे सेवन करताना विशेष काळजी घ्यावी. तसेच कॅटरर्सनेही स्वच्छतेची काळजी घेण्याची गरज आहे. कच्च्या भाज्यांचे सेवन करण्याऐवजी शिजवलेल्या खाद्यपदार्थांचे सेवन करावे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

कोणत्याही विवाह सोहळ्यात किंवा समारंभाला गेल्यास कोणत्याही पृष्ठभागाला किंवा इतर वस्तूंना हात लावू नये, तसेच जेवणासाठी बाऊल किंवा ताट घेताना टिश्यू पेपर किंवा नॅपकिनने ते स्वच्छ करून घ्यावे. तसेच जेवणापूर्वी आणि जेवणानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत, असे तज्ज्ञांनी सांगितले.

कॅटरिंग विभागानेही विशेष काळजी घेण्याची गरज आहे. सुरक्षेसाठी आणि फैलाव टाळण्यासाठी सेल्फ सर्व्हिस काऊंटर ठेवावेत. तसेच पाहुण्यासांठी पॅक केलेले फूड बाक्सची सोय करावी. त्यामुळे संपर्क आणि गर्दी टाळण्यास मदत होणार आहे. तसेच अशा समारंभासाठी मोजक्याच लोकांना बोलवावे, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत.

हॉल आणि समारंभाच्या ठिकाणी सॅनिटायझेशन आणि स्वच्छतेची काळजी घ्यावी. तसेच सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोनाच्या नियमांचे पालन करावे. आजारी व्यक्ती, लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींना विवाहसोहळ्यासाठी नेऊ नये. खोकला,ताप आणि सर्दी असलेल्यांपासून निकटचा संपर्क टाळावा, अशा प्रकारे आवश्यक ती काळजी घेतल्या कोरोना संक्रमणाचा धोका कमी होणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: