राज्यात रविवारी कोरोनाचा विस्फोट!तब्बल 57,074 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांची एकूण संख्या 30 लाखांच्या पुढे

राज्यात रविवारी कोरोनाचा विस्फोट!तब्बल 57,074 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांची एकूण संख्या 30 लाखांच्या पुढे

ग्लोबल न्यूज – राज्यातील कोरोना रुग्णांचा वाढता आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. आज दिवसभरात झालेली कोरोना रुग्णांची वाढ चिंता वाढवणारी असून, आज राज्यात तब्बल 57 हजार 074 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. राज्यातील हि आजवरची सर्वाधिक रुग्ण वाढ आहे. मुंबईत आज 11 हजार 163 रुग्णांची नोंद झाली तर, पुण्यात 6 हजार 625 नव्या रुग्णांची वाढ झाली.

आरोग्य विभागाच्या हावाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 30 लाख 10 हजार 597 वर जाऊन पोहोचली आहे. त्यापैकी 25 लाख 22 हजार 823 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आज 27 हजार 508 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.08 टक्के एवढं झाले आहे.

राज्यात सध्या राज्यात 4 लाख 30 हजार 503 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आज 222 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, आजवर एकूण 55 हजार 878 जण कोरोनामुक्त मुत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.86 टक्के एवढा आहे.

सध्या राज्यात 22 लाख 05 हजार 899 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 19 हजार 711 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आतापर्यंत 2 कोटी 05 लाख 40 हजार 111 नमुने तपासण्यात आले आहेत.

राज्यात शनिवार, रविवारचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज (रविवारी) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी सात पर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत.

आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. महाराष्ट्रात कडक निर्बंध तयार करण्यात आले आहेत. उद्या संध्याकाळी 8 वाजेपासून ते लागू राहतील. राज्यात नाईट कर्फ्यू राहील. सगळे मॉल, रेस्टॉरंट, बार बंद राहतील. अत्यावश्यक सेवा चालू राहतील. सरकारी कार्यालय 50 टक्के क्षमतेनं, इंडस्ट्री पूर्णपणे चालू, कन्स्ट्रक्शन साईट चालू राहतील. राज्यातील गार्डन, चौपाट्या, धार्मिक स्थळं बंद राहतील. तसेच सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमही बंद राहणार आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: