कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापनदिन सोहळा रद्द

सध्या राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या पुन्हा एकदा राज्य सरकारच्या अडचणीत वाढ करताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सर्व राजकीय पक्षांना मोर्चे, निर्दर्शने आणि गर्दी न जमावण्यासारखे कार्यक्रम आयोजित न करण्याचे आव्हान केले होते.

आता या आव्हानाला प्रतिसाद देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम रद्द केला आहे. अशी माहिती खात्रीदायक सूत्राच्या माध्यमातून समोर येत आहे. मात्र , वर्धापनदिन सोहळा रद्द केला असला तरी राज्यभरात ९ मार्च रोजी मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी केली जाणार असल्याची माहितीही मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी दिली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते आणि गर्दीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे यंदा मनसेचा वर्धापनदिन सोहळ्याचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती नितीन सरदेसाई यांनी ही माहिती दिली आहे. त्याऐवजी ९ मार्च रोजी मनसेच्या वर्धापनदिनी राज्यभरात सदस्य नोंदणी मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

 

Team Global News Marathi: