आता फक्त गांधींच्या जागी मोदींचा फोटो बाकी आहे- नवाब मलिक

पश्चिम बंगालसह पाच राज्यांमध्ये निवडणुकीला सुरवात होणार आहे. या विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये खरी लढत पाहायला मिळणार आहे. त्यातच बंगालमध्ये लसीकरण सुरू आहे. मात्र, लसीकरण प्रमाणपत्रावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोवरून नवा वाद निर्माण झाला होता. तृणमूलने लसीकरण प्रमाणावरील

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोवर आक्षेप घेत केंद्रावर टीका केली होती. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादींने मोदींना टोला लगावला आहे.
काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने निवडणूक होणाऱ्या राज्यातील पेट्रोल पंपांवरील पंतप्रधान मोदी यांचे फोटो असलेले होर्डिंग्ज काढण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता लसीकरण प्रमाणपत्रावरील फोटोही काढण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला दिले आहेत. याच मुद्द्यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी फोटो छापण्याच्या स्पर्धेत खूपच पुढे निघून गेले आहेत. सर्व पेट्रोल पंपांवर, रेल्वे स्थानकांवर, विमानतळांवर मोदींचेच फोटो आहेत. जिकडे पहावं तिकडे मोदींचेच फोटो दिसतात. खादीच्या कॅलेंडरवर महात्मा गांधींच्या फोटोच्या जागी स्वतःचा फोटो छापला. आता लसीकरण प्रमाणपत्रावरही मोदींनी स्वतःचा फोटो लावला आहे. हे असंच चालत राहिलं, तर मोदीजी नोटेवरून गांधींचा फोटो हटवून स्वतः फोटो छापतील, असा टोला मंत्री नवाब मलिक यांनी पंत्रधन नरेंद्र मोदींना लगावला आहे.

Team Global News Marathi: