संजय राऊतांचे वादग्रस्त वक्तव्य, गुवाहाटीतून ४० आमदारांचे मुडदे येतील

संजय राऊतांचे वादग्रस्त वक्तव्य, गुवाहाटीतून ४० आमदारांचे मुडदे येतील

आम्हाला पाहून मोदी-शहादेखील रस्ता बदलतात; संजय राऊतांची चौफेर फटकेबाजी

मुंबई : ज्याने बाळासाहेब ठाकरेंची गद्दारी केली, तो संपला, बाळासाहेबांचे श्राप लागले. एका बापाचे असाल तर ४० जणांनी राजीनामा द्या निवडणुकीला सामोर जा. शिवसेनेला बंड नवीन नाही. गुलाब पाटलांची भाषण पाहिली तर शिवसेनेत हाच असं दिसला. तुझ्या मायला ढुंगणाला पाय लावून पळाला. पुन्हा तुला पानटपरीवर बसवू. माझा शब्द कधी खोटा ठरणार नाही असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. यासोबतच आता गुवाहाटीमधून थेट 40 मृतदेह येतील, त्यांना थेट शवागरात पाठवण्यात येणार असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून आता राजकारण आणखी वाढण्याची शक्यता आहे.

संजय राऊत म्हणाले की, संदीपान भुमरे हा वॉचमेन होता, त्याला मुंबई माहिती नव्हती. हॉटेलमध्ये वडा सांबार खाता येत नव्हता. आज त्याला मंत्री बनवले. शिवसेनेमुळे मी मंत्री झालो असे अश्रू उद्धव ठाकरे आणि माझ्यासमोर म्हटलं. हे अश्रू मगरीचे होते. गुवाहाटीचे हॉटेल म्हणजे बिग बॉसचं घर. महाराष्ट्रात खरा बिग बॉस हा बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे आहेत. प्रकाश सुर्वे भाजी विकत होता त्याला पुन्हा भाजी विकायला लावू असंही त्यांनी सांगितले.

“संजय राऊत कोणी नाही. पण शिवसेना या चार अक्षरांनी आम्हाला राष्ट्रीय नेता केले आहे. आज कुठेही जा बाळासाहेब ठाकरेंचा वाघ आहे तो शिवसेनेमुळे म्हणतात. आम्हाला पाहिल्यावर याच्या नादाला लागायला नको म्हणून मोदी आणि शाह रस्ता बदलतात. कोणाची हिंमत नाही आमच्या हाताला धरुन बाजूला खेचायची. हा बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे याच्या नादाला लागू नका म्हणतात. याच्या हातात भगवा झेंडा आहे. वेळ पडली तर झेंडा खिशात ठेवेल आणि दांडा बाहेर काढेल,” असे संजय राऊत यांनी म्हटले.

किरीट सोमय्या काय करणार?

संजय राऊत यांनी यावेळी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार टीका केली. किरीट सोमय्या आता बेरोजगार होणार असल्याचा टोला त्यांनी लगावला. सोमय्या दररोज सकाळी वृत्तवाहिन्यांवर प्रताप सरनाईक आणि यशवंत जाधव, यामिनी जाधव यांना तुरुंगात पाठवणार असल्याचे म्हणायचे. देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांनी ईडीचे प्रकरण मिटवले असून आपण सुरत जात असल्याचे सरनाईक यांनी सांगितल्याचेही राऊत यांनी म्हटले. माझ्यावर ईडीची कारवाई झाली. राहते घर, वडिलोपार्जित जमीन जप्त करण्यात आली. लहान मुलींवर ईडीची कारवाई झाली. मात्र, आम्ही गुडघे टेकले नसल्याचे राऊत यांनी म्हटले.

‘हे बाहेरुन येतात आणि आम्हाला शिवसेना काय आहे ते शिकवतात. अब्दुल सत्तार आणि हिंदुत्वाचा काय संबंध? महाराष्ट्र आणि ठाकरे कुटुंबाविरोधात मोठं कारस्थान सुरू आहे. महाराष्ट्र त्यांना तीन भागात तोडायचा आहे. याला शिवसेना विरोध करेल, म्हणून शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे,’ असा गंभीर आरोपही राऊत यांनी केला.

तसेच मी हे संकट मानत नाही. शिवसेना ताकदीने पुढे नेऊ. यापुढे कोणावर विश्वास ठेवायचा आणि कुणाच्या पालख्या वाहायच्या हे आपल्याला ठरवावं लागेल. प्रकाश सुर्वे पुन्हा विधानसभेत दिसणार नाही. ४० आमदारांचे मृतदेह गुवाहाटीतून येतील त्यांना थेट शवागृहात पोस्टमोर्टमसाठी पाठवू. कामाख्या देवीसाठी ४० रेडे पाठवले आहेत. बळी द्या असं खळबळजनक विधान संजय राऊत यांनी दहिसर येथील शिवसेनेच्या मेळाव्यात केले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: