शिवसैनिक बंडखोरीच्या गोष्टी कधी खपवून घेणार नाही, त्यांच्यामध्ये प्रचंड शक्ती,शरद पवारांकडून तोंडभरुन कौतुक

शिवसैनिक प्रचंड शक्तीशाली, लागेल ती कष्ट घेण्याची तयारी, पवारांकडून तोंडभरुन कौतुक

शिवसैनिक बंडखोरीच्या गोष्टी कधी खपवून घेणार नाही, त्यांच्यामध्ये प्रचंड शक्ती,शरद पवारांकडून तोंडभरुन कौतुक

शरद पवार यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिद घेतली. उद्या विरोधी पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा अर्ज भरणार आहोत. त्यासाठी दिल्लीत आल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. तसेच यावेळी त्यांनी महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर देखील भाष्य केलं.

हायलाइट्स:

शिवसैनिक प्रचंड शक्तीशाली,

लागेल ती कष्ट घेण्याची तयारी,

पवारांकडून तोंडभरुन कौतुक

मुंबई : “मला जी शिवसेना माहितीये, शिवसैनिक बंडखोरीच्या गोष्टी कधी खपवून घेणार नाही. त्यांच्यामध्ये प्रचंड शक्ती आहे. प्रचंड संघटन आहे आहे. पडेल तितकी कष्ट घेण्याची त्यांची तयारी आहे. त्यामुळे जरी ४०-५० आमदारांनी काही भूमिका घेतली असली तरी त्याचा फार परिणाम संघटनेवर होणार नाही”, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसैनिकांचं तोंडभरुन कौतुक केलं. तर एकनाथ शिंदे हॉटेलमध्ये बसून बहुमत असल्याचा दावा करत आहेत, ते मुंबईत का येत नाहीत? असा सवालही त्यांनी विचारला.

शरद पवार यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. विरोधी पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा उद्या अर्ज भरणार आहोत. त्यासाठी दिल्लीत आल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. तसेच यावेळी त्यांनी महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर देखील भाष्य केलं.

“शिवसेनेचा एक ग्रुप आसाममध्ये गेलाय, त्यांच्याकडून जे काही स्टेटमेंट येतायत, त्यावरुन एक गोष्ट क्लिअर त्यांना सत्तापरिवर्तन हवंय. शिवसेनेची ही खात्री आहे, की गेलेले लोक परत आल्यानंतर त्यांच्या भूमिकेत बदल होईल. शिवसेनेला मदत करणारे राष्ट्रवादी आणि काँग्रेसची भूमिका राज्याचं नेतृ्व करणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणं हीच आहे”, असंही पवारांनी यावेळी स्पष्ट केलं. “एकनाथ शिंदे यांच्याकडे संख्याबळ आहे तर मग ते गुवाहाटीला का बसले आहेत? मुंबईत का येत नाहीत?”, असा सवाल शरद पवार यांनी विचारला.

“बंडखोरांनी गुजरात आणि आसाम राज्य निवडलंय. दोन्ही राज्ये भाजपच्या ताब्यात आहेत. शिंदे काल म्हणाले, पॉवरफुल्ल शक्तीचा आपल्याला पाठिंबा मग ती पॉवरफुल्ल शक्ती नक्की कोण?, हे मी सांगण्याची गरज नाही”, असं म्हणत त्यांनी भाजपचा नामोल्लेख टाळला. “राष्ट्रपती राजवटीची कुणी मागणी केली माहिती नाही. राष्ट्रपती राजवट आली तर बंडाचा फायदा काय? जर राष्ट्रपती राजवट आली तर भाजपने एवढं केलं त्याचा काय फायदा?”, असा टोला शरद पवार यांनी भाजपला लगावला.

“उद्धव ठाकरेंवर आमचा पूर्ण विश्वास आहे. शिवसेनेचे गेलेले आमदार परत येतील हा विश्वास आहे. त्यामुळे आमचा पूर्ण पाठिंबा उद्धव ठाकरे यांना आहे. हे सरकार टिकलं पाहिजे, यासाठी तिन्ही पक्षांचे आवश्यक प्रयत्न सुरु आहेत”, असंही पवारांनी सांगितलं. तसेच उद्धव ठाकरे यांच्याशिवाय दुसरे मुख्यमंत्री महाविकास आघाडीला चालतील का?” असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर पवार म्हणाले, “आमची लाईन क्लिअर आहे, आमचा शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांना पाठिंबा असेल…!”

शरद पवार यांच्याकडून शिवसैनिकांचं कौतुक

“मला जी शिवसेना माहितीये, शिवसैनिक बंडखोरीच्या गोष्टी कधी खपवून घेणार नाही. त्यांच्यामध्ये प्रचंड शक्ती आहे. प्रचंड संघटन आहे आहे. पडेल तितकी कष्ट घेण्याची त्यांची तयारी आहे. त्यामुळे जरी ४०-५० आमदारांनी काही भूमिका घेतली असली तरी त्याचा फार परिणाम संघटनेवर होणार नाही”, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसैनिकांचं तोंडभरुन कौतुक केलं.

ग्लोबल न्युज नेटवर्क: