मूठभर शेतकऱ्यांवर शेतकऱ्यांचे कायदे ठरत नसतात, चंद्रकांत पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य

मूठभर शेतकऱ्यांवर शेतकऱ्यांचे कायदे ठरत नसतात, चंद्रकांत पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य

कृषी विधेयकांच्या समर्थनार्थ कणकवली येथे माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार रविंद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भव्य ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. यावेळी बोलताना भाजप भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

मूठभर शेतकऱ्यांच्यावर कायदे ठरत नसतात’ असं म्हणत शेतकरी कायद्याला विरोध करणाऱ्यांवर टीका केली आहे. ते आमदार नितेश राणे यांनी आयोजित केलेल्या एका सभेत बोलत होते. चंद्रकांत पाटील यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून अनेक नेटकऱ्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या या वाक्याचा खरपूस समाचार घेतला आहे.

नवा कृषी कायदा हा शेतकऱ्यांच्या हिताचा असून सर्व बंधने या कायद्याने काढून टाकली तर मग काय चुकले? का येथे आंदोलने होत आहेत? ही राजकीय आंदोलने आहेत. त्यामुळे यात समेट होईल, असे मला वाटत नाही. शेतीमधले राहुल गांधींना, उद्धव ठाकरेंना काय कळते? ज्यांना या गोष्टीबद्दल काहीच कळत नसल्यामुळे ते या विधेयकांचे समर्थन कसे करणार? असा शब्दात त्यांनी केली केली आहे.
पाटलांचे

ग्लोबल न्युज नेटवर्क: