वादग्रस्त कृषी कायदे रद्द होणार, आज होणार अंतिम निर्णय ?

 

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी कृषी कायदे रद्द करण्याची मोठी घोषणा केली होती. यासंदर्भात आज केंद्रीय कॅबिनेट मंत्र्याची बैठक पंतप्रधानांच्या निवासस्थानी पार पडणार आहे. या बैठकीनंतर कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयावर अखेरचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या कृषी कायदे रद्द करण्यावर आज निर्णय घेतला जाऊ शकतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच जनतेला संबोधित केलं होतं. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. अनेक दिवसांपासून वादात राहिलेले 3 कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय केंद्राने घेतला असल्याची घोषणा मोदींनी यावेळी केली होती. मोदी कॅबिनेट आज बैठक घेऊन या घोषणेवर शिक्कामोर्तब करणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश आले आहे.

मोदी यावेळी म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या विकासासाठी आम्ही ३ कृषी कायदे आणले होते. छोट्या शेतकऱ्यांना ताकद मिळावी. हा यामागचा उद्देश्य होता. देशातील कृषी वैज्ञानिक, शेतकरी संघटना यांच्याशी चर्चा करून आम्ही हे कायदे आणले होते. मात्र या कृषी कायद्यांना विरोध झाल्यानंतर हा विषय सुप्रीम कोर्टात (supreme court) गेला आता आम्ही हे कायदे रद्द करण्याचा निर्णय घेत आहे,’ असं त्यांनी सांगितलं होते.

Team Global News Marathi: