सचिन वाझे यांच्या उपस्थितीत शिजला मनसुख हिरेन यांच्या हत्येचा कट

मुंबई : अंबानी स्फोटकं प्रकरणी ताब्यात असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याला काही दिवसांपूर्वी NIA ने ताब्यात घेतली होती. मात्र आता या प्रकरणी अनेक खुलासे होताना दिसत आहे. त्यातच आता मनसुखच्या हत्येसाठी रचण्यात आलेल्या कटाची माहिती समोर आली आहे.

मनसुख हिरेन हत्येचा कट ज्या बैठकीत रचण्यात आला, त्या बैठकीला निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे व माजी पोलिस कॉन्स्टेबल विनायक शिंदे हे दोघेही उपस्थित होते. हत्येचा कट रचणाऱ्याशी वाझे यांनी मोबाइलवर संपर्क साधला होता. या हत्येच्या मागे कारण काय होते आणि नेमका कट काय होता, याचा छडा लावण्यासाठी आम्ही तपासात अगदी जवळ पोचलो आहोत असा दावा NIA ने मंगळवारी मुंबईतील विशेष NIA न्यायालयात केला. त्यानंतर विशेष न्यायाधीश प्रशांत सित्रे यांनी मनसुख हत्या प्रकरणात आरोपी विनायक शिंदे व क्रिकेट बुकी नरेश गोर यांच्या NIA कोठडीत ७ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे.

या प्रकरणाचा पूर्वी तपास करणाऱ्या ATS ने शिंदे व गोर यांना अटक केली होती. ठाणे न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ATS’ने तपास ‘एनआयए’कडे दिला. तसेच, न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे शिंदे व गोर यांची कोठडीही ‘NIA’ला मिळाली होती. कोठडीची मुदत संपत असल्याने या दोघांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्या वेळी ‘NIA’तर्फे विशेष सरकारी वकील सुनील गोन्साल्विस यांनी न्यायालयाला महत्त्वाची माहिती दिली. ‘तपासादरम्यान तपास पथकाला एक कागद सापडला. त्यात १४ मोबाइल क्रमांक होते. त्यातील पाच क्रमांक हे वाझे यांच्यासाठी होते. त्यातील एकावरून वाझे हे कट रचणाऱ्या मूळ कारस्थान्याशी संपर्क साधत होते.

Team Global News Marathi: