आरेमधील मेट्रो कारशेड प्रकरणात महाराष्ट्राची कोंडी करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे: किशोरी पेडणेकर

आरेमधील मेट्रो कारशेड प्रकरणात महाराष्ट्राची कोंडी करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे: किशोरी पेडणेकर

मुंबई: आरेमधील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतल्यानंतर केंद्र विरुद्ध राज्य सरकार संघर्ष निर्माण होत आहे. मेट्रो कारशेडची कांजूरमार्गची जागा ही केंद्राची असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. जर केंद्राची जागा आहे, तर ती जागा महाराष्ट्राच्या कामासाठी मागत आहोत. अशा अनेक जागा आहेत, त्या केंद्राने दिल्या असतील. पण कुरघोड्या करणं असे काही होत आहे.

तर मराठीतील म्हणीप्रमाणे आई नीट जेवू देईना अन् बाप भीक मागू देईना अशी महाराष्ट्राची अवस्था करण्याचं षडयंत्र हे रचलं जात आहे,” असे महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या. तसेच देशाचे पंतप्रधान हे सक्षम आहेत ते जरुर मुंबईचा आणि महाराष्ट्राच्या भल्याचा विचार करतील अशी अपेक्षा आहे. अशी टीका देखील त्यांनी केली.

ग्लोबल न्युज नेटवर्क: