काँग्रेसमध्ये तळवे चाटून महसुलमंत्रीपद मिळवलं. आता तळवे चाटल्याने केंद्रात मंत्री केलं

 

म्हाडा वसाहतीतील कार्यालयावरून भाजपा आमदार नितेश राणेंनी शिवसेना नेते आणि माजी परिवहन मंत्री आणि आमदार अनिल परब यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका केली. टीका करताना मात्र नितेश राणेंची जीभ घसरली होती.उद्धव ठाकरेंच्या हिंमत नाही. उद्धव ठाकरे हे ना*** आहेत, अशी खालच्या पातळीतील टीका केली होती. दरम्यान, याला आता शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

नितीन देशमुख यांनी राणेंच्या टीकेला उत्तर देताना, “नारायण राणे आणि नितेश राणेंचा चेहरा पाहिला तरी महाराष्ट्रायीन सोडा हिंदुस्थानीही वाटत नाही. वारंवार चुकीच्या पद्धतीने बोलत असतात. नितेश राणे स्वत:लाच साहेब म्हणतात. हे भाजपाचे तळवे चाटत आहेत. काँग्रेसमध्ये तळवे चाटून महसुलमंत्रीपद मिळवलं. आता तळवे चाटल्याने केंद्रात मंत्री केले,” अशी टीका नितीन देशमुखांनी केली आहे.

दरम्यान, अनिल परबांवर हल्लाबोल करताना नितेश राणे यांनी, “दुसऱ्यांची घरं पाडण्याची तक्रारी देणाऱ्या लोकांबरोबर कधीतरी नियती खेळ करत असतेच. आमचं, कंगणाचं घर तोडलं. कधी कोणाला अट केली. अनिल परब हे ‘मातोश्री’चे कारकून आहे. उद्धव ठाकरेंच्या हिंमत नाही. उद्धव ठाकरे हे ना*** आहेत. त्यांना अनिल परबांसारखे कारकून लागतात. त्यामुळे अनिल परबांचं घर झाकी है ‘मातोश्री’ २ बाकी है. ‘मातोश्री’-२ मध्ये कोणत्याही शिवसैनिक आणि शिल्लक सेनेच्या नेत्याला प्रवेश नाही,” असा टोला नितेश राणेंनी लगावला होता.

Team Global News Marathi: