काँग्रेसची भाजप आणि अमित शहांविरोधात तक्रार, नेमकं प्रकरण काय आहे ?

 

कर्नाटक विधानसभा निवडणुकीला सवच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे, तर दुसरीकडे भाजपने आपले स्टार प्रचारक निवडणुकीच्या रिंगणात प्रचारासाठी उतरवले आहेत दरम्यान, आता काँग्रेसने पक्षावर प्रक्षोभक विधाने आणि द्वेष पसरवल्याचा आरोप करत भाजपच्या रॅलीला मुद्दा बनवले आहे. याविरोधात काँग्रेस नेत्यांनीही अमित शहा आणि भाजपविरोधात बेंगळुरू येथील हाय ग्राउंड्स पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

भाजपने भडकाऊ विधाने केली, शत्रुत्व आणि द्वेषाला चालना दिली आणि विरोधकांना बदनाम करण्याचे काम केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. आज काँग्रेस नेते रणदीप सिंग सुरजेवाला, डॉ. परमेश्वर आणि डीके शिवकुमार यांनी तक्रार दाख केली. यापूर्वी काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनीही याबाबत ट्विट केले होते. “भाजप आणि अमित शहा दररोज कर्नाटकचा अपमान करत आहेत. जेपी नड्डाजी म्हणतात की कन्नडिगांना मोदींच्या आशीर्वादाची गरज आहे. राज्य चालवायला आणि मोदींच्या हाती एकही कन्नडिगा मिळू शकत नाही का, असा सवाल सुरजेवाल यांनी केला.

कर्नाटकातील भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी नुकत्याच केलेल्या टीकेला प्रियांका गांधी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. कर्नाटकला सध्याच्या कोणत्याही नेत्याच्या आशीर्वादाची गरज नाही आणि ‘मत न दिल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादापासून जनतेला वंचित ठेवण्याची धमकी देणे हा राज्यातील जनतेचा अपमान आहे’, असं गांधी यांनी ट्विट केले आहे. या सव घडामोडीवर पुन्हा एकदा कर्णताकात राजकीय ववतारां चांगलेच तापणार आहे.

Team Global News Marathi: