पूरग्रस्तांसाठी ठाकरे सरकारची ११ हजार ५०० कोटी तातडीची मदत जाहीर!

 

पश्चिम महाराष्ट्र सह कोकणात पडलेल्या मुसळधार पावसामुळे सामन्यजनजीवन वसुलीत झाले होते. याच पार्श्वभूमीवर मागच्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोकणात, सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्याचा दौरा करून पुरबाधित भागाची स्वतः पाहणी करत आहेत.

आता त्या पाठोपाठ राज्य सरकारने पुरबाधितांना दिलासा देणारा निर्णय घेलेला आहे. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्यात काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. अतीवृष्टीमुळे राज्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी तातडीची मदत तसेच दुरुस्ती व इतर दीर्घकालीन उपायांसाठी ११ हजार ५०० कोटी रुपये खर्चास आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्ज्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पुरग्रस्थांना मदत जाहीर करण्याच्या चर्चा सरकार कडून येत होत्या पण आज त्यावर अंबलबजावणी झाली आहे. अतीवृष्टीमुळे राज्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी तातडीची मदत तसेच दुरुस्ती व इतर दीर्घकालीन उपायांसाठी ११ हजार ५०० कोटी रुपये खर्चास आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

Team Global News Marathi: