काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई : राज्यात मागच्या काही दिवसांपासून अनेक पुढाऱ्यांना तसेच आघाडी मधील अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले होते. काही दिवसांपूर्वी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी सौ रश्मी उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली होती.

आता त्या पाठोपाठ काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि सतत पत्रकार परिषद आणि ट्विट करून भाजपाची झोप उडवणारे सचिन सावंत यांना सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे आता मंत्र्यांसोबत आघाडीच्या प्रवक्त्यांना सुद्धा कोरोनाने आपल्या जाळ्यात ओढले आहे.

माझी रॅपिड अॅन्टीजन टेस्ट सांगते की मी करोना पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला माझी विनंती आहे की, त्यांनी तपासणी करून घ्यावी. मी प्रत्येकाला विनंती करतो की करोना नियमांचे पालन करा व सुरक्षित रहा. असं सचिन सावंत यांनी ट्विट केलं आहे.

Team Global News Marathi: