नागपूर | काँग्रेसच्या नेत्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करु नये, असा सल्ला खुद्द शरद पवारांची चर्चा झाल्यानंतर राहुल गांधी यांना दिल्याची माहिती समोर आली होती मात्र असे असताना महाराष्ट्रातील काँग्रेस नेते सावरकरांच्या मुद्द्यावरुन मागे हटण्यास तयार नाही. तर आता काँग्रेस नेत्यांचे मुलेही सावरकरांबद्दल अर्वाच्च भाषेचा वापर करत असल्याचे उघड झाले आहे. काँग्रेसचे माजी मंत्री विजय वडेट्टीवर यांच्या मुलगी शिवानी वडेट्टीवार यांनी आपल्या भाषणाचा एक व्हिडीओ ट्विट केला. मात्र या व्हिडीओत शिवानी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत खालच्या शब्दाचा वापर केल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिवानी वडेट्टीवार यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयीची एक व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. बलात्काराला राजकीय हत्यार म्हणून सावरकरांचे समर्थन देणारे सावरकर हिंदूंचे प्रेरणास्थान कसे? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. शिवानी वडेट्टीवार यांचा हा व्हिडीओ भाजप नेत्याकडून रिट्वीट करण्यात आला आला आहे. उद्धव ठाकरे यावर बोलणार की बोटचेपी भूमिका घेणार? असा प्रश्न भारतीय जनता पक्षाने आता उपस्थित केला आहे.
‘हे लोकं फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांवर कधीच मोर्चा काढणार नाहीत. कुठला मोर्चा काढतात? तर सावरकर गौरव मोर्चा काढतात. सावरकर गौरव मोर्चा काढून काय करतात? सावरकर मला तर… माझ्यासोबत सगळ्या महिला भगिनी इथे उपस्थित आहेत. सगळ्यांना भीती वाटत असेल कारण की सावरकरांचे विचार होते बलात्कार हे राजकीय हत्यार आहे. हे तुम्ही आपल्या राजकीय विरोधकांना विचारायला पाहिजे. या विचारांचे ते समर्थन करतात. मग माझ्या सारख्या महिला भगिनी कसे काय सुरक्षित राहणार? आणि अशा लोकांचा प्रचार करत हे लोकं रॅली काढतात, अशी टीका शिवानी वडेट्टीवार यांनी केली आहे.