कोणताच अश्लील अर्थ दरेकरांच्या मनात नाही- चंद्रकांत पाटील

 

राष्ट्रवादी काँग्रेस आणि भापजमध्ये गेल्या जोरदार शाब्दिक युद्ध सुरु झालेले पाह्यला मिळत आहे. लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. पुणेकर या १६ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेत प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली होती.

 

यावरून राष्ट्र्वादीने जोरदार टीका प्रवीण दरेकर यांच्यावर केली होती. मात्र आता दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाद्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दरेकरणाच्या विधानावर त्यांची पाठराखण केली आहे. . प्रवीण दरेकरांच्या मनात अश्लील अर्थ नव्हता, असं म्हणत चंद्रकांतदादांनी सारवासारव केली आहे.

प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १६ सप्टेंबरला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सुरेखा पुणेकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाची राज्यात जोरदार चर्चा आहे. काल पुण्याच्या शिरुरमध्ये प्रवीण दरेकर यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी केलेल्या भाषादरम्यान दरेकर बोलता बोलता भलतंच बोलून गेले. राष्ट्रवादी रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे, असं वक्तव्य त्यांनी केलं. ज्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे.

Team Global News Marathi: