“काॅंग्रेस सोडून देशाचं राजकारण होऊच शकत नाही, काॅंग्रेस देशाच्या केंद्रस्थानी असेल

 

मुंबई | | देशात सध्या जोरदार राजकीय रणधुमाळी चालू आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गोवा, पंजाब, पश्चिम बंगाल, गुजरात या राज्यांमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडताना पहायला मिळत आहेत.महाविकास आघाडीच्या माध्यमातून काॅंग्रेस महाराष्ट्रात सत्तेत आहे. काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात नेहमीच चर्चा होतं असते. अशातच खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यापासून शिवसेना खासदार संजय राऊत काॅंग्रेसबद्दल सकारात्मक भूमिका मांडत आहेत. काॅंग्रेस सोडून देशाचं राजकारण होवू शकत नाही, काॅंग्रेस देशाच्या केंद्रस्थानी असेल, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्याची सध्या राज्यासह देशात जोरदार चर्चा होतं आहे.

आपला जुना २५ वंश जुना मित्र पक्ष सोडून शिवसेनेनं महाराष्ट्रात काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासोबत सत्ता स्थापन केली. राज्यातील महाविकास आघाडीनं जसं सत्तेपासून भाजपला रोखलं अगदी तसंच देशात भाजपला रोखण्याची तयारी विरोधी पक्षांतर्फे करण्यात येत आहे. मात्र अशातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सातत्यानं काॅंग्रसेवर टीका करताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांचं हे वक्तव्य महत्त्वपूर्ण मानलं जात आहे.

Team Global News Marathi: