काॅंग्रेस नेत्यांच्या बैठकीतील बॅनरवर ‘Chor Group Meeting’ असा उल्लेख वाचा काय आहे सत्य |

 

नवी दिल्ली | सोशल मीडियात सध्या काॅंग्रेसच्या नेत्यांच्या बैठकीचा एक फोटो व्हायरल होत असून या फोटोची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे या फोटोतील बॅनरमुळे सोशल मीडियावर युजर्स उलट सुलट प्रतिक्रिया देत आहेत. या बैठकीत सोनिया गांधी मनमोहन सिंह, राहुल गांधींसह अतर अनेक नेत दिसत आहेत मात्र त्यांच्या मागे असलेल्या बॅनरवर ‘Chor Group Meeting’ असे इंग्रजीत लिहिलेले दिसत आहे.

मात्र काॅंग्रेसच्या बैठकीत चोर ग्रुप मिटिग असे लिहिलेला बॅनर लावण्यात आला होता का याची पडताळणी केली असताना गुगल रिव्हर्स अमेज आणि काही किवर्ड्सच्या साहाय्याने शोध सुरु केला असता wionews या वेबसाईटवर एका लेखात हा फोटो आढळून आला या फोटोत कुठेही ‘Chor Group Meeting’ असे इंग्रजीत लिहिलेले आढळून आले नाही पण तो फाइल फोटो असल्याचा यात उल्लेख करण्यात आला आहे.

हा फोटो खूपच जुना असून झी न्यूज ची १० आॅगस्ट २०१९ रोजीच्या बातमीमध्ये हा फोटो आढळून आला होता तसेच हा फोटो शेअर करण्यात आला आहे. या बातमीत म्हटले आहे की, लवकरच काँग्रेस पक्षात नवा प्रमुख मिळू शकतो. काँग्रेस कार्यकारिणीची बैठक शनिवारी होणार आहे. सकाळी ११ वाजता बैठक सुरू होईल. सभेचा मुख्य अजेंडा काँग्रेस अध्यक्ष निवडणे आहे.

Team Global News Marathi: