महिलेला मारहाण केल्याने भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

 

संभाजीनगर | राज्यात विरोध बसलेले भारतीय जनता पक्षाचे नेते आपल्या विधानामुळे आणि वर्तणुकीमुळे स्वतःचे आणि पक्षाचे नाव खराब करताना अनेकदा आढळून आले आहेत. त्यातच आता संभाजीनगरमध्ये एका भाडेकरू महिलेला अश्लील शिवीगाळ करीत मारहाण केल्याची तक्रार भाजपाचा जिल्हा सचिव अशोक दामले व त्याच्या पत्नीच्या विरोधात पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसारपीडित महिला सकाळी घरासमोर झाडू मारत होती. त्यांच्या घरासमोर राहणारा अशोक दामले यांची पत्नी देखील त्यांच्या अंगणात झाडू मारत होती. दामले यांच्या पत्नीने पीडितेला उद्देशून शिवीगाळ सुरू केली. त्याचा जाब विचारात तुम्ही दुसऱ्याला नाव ठेवण्यापेक्षा स्वतःचा नवरा काय करतो ते बघा असे तिने म्हटले.

यावेळी दामलेच्या बायकोने नवऱ्याला आवाज देऊन बाहेर बोलावले दामले हातात तिचा रोड घेऊन बाहेर आला आणि शिवीगाळ करीत राहणे पीडितेला मारहाण करण्यास सुरुवात केली या पिढीचा गंभीर जखमी झाली. असं पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून दामले दाम्पत्य विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Team Global News Marathi: