अण्णासाहेब पाटलांची काँग्रेसने हत्या केली आहे, विनायक मेटे यांचा गंभीर आरोप

बीड | राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्धा चांगलाच तापत असताना आता शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस पक्षावर गंभीर आरोप लगावला आहे. या आरोपामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची सहायता वर्तवली जात आहे. १९८२ मध्ये मराठा आरक्षणासाठी स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी मंत्रालयावर मोर्चा काढला होता. पण काँग्रेसने त्यांच्या मागण्यांचा साधा विचारही केला नाही. अण्णासाहेब पाटलांची हत्या करण्याचं काम काँग्रेसनं केलं आहे, असा गंभीर आरोप विनायक मेटे यांनी केला.

विनायक मेटे यांनी उद्या शनिवारी बीडमध्ये मराठा मोर्चाचं आयोजन केलं आहे. या मोर्च्याच्या तयारीची माहिती देण्यासाठी मेटे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. १९८२ मध्ये मराठा आरक्षणासाठी स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी मंत्रालयावर मोर्चा काढला होता. पण काँग्रेसने त्यांच्या मागण्यांचा साधा विचारही केला नाही. अण्णासाहेब पाटलांची हत्या करण्याचं काम काँग्रेसनं केलं आहे, असं सांगतानाच मराठा आरक्षणांसदर्भात बळी घेण्याचं पहिलं काम काँग्रेसनं केल आहे. हा माझा आरोप आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या या काँग्रेसच्या हत्याच आहेत, असा गंभीर आरोपही मेटेंनी केला होता.

पुढे बोलताना मेटे म्हणाले की, उद्याचा मोर्चा हा १०० टक्के निघणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाला आम्ही धडक देणार आहोत. उद्याचा मोर्चा हा मुका मोर्चा नसेल तर तो बोलका असेल. सरकारच्या चूका दाखवणारा असेल. उद्या आम्ही आमची भूमिका जाहीर करू. उद्या मोर्चाला येताना कोणी अडवलं तर त्यांना आम्ही परत मोर्चात आणण्याचं काम करणार. कोणीही घाबरण्याचं कारण नाही. मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हा असे आव्हान त्यांनी केले आहे.

Team Global News Marathi: