पंतप्रधान मोदी यांच्या हत्येची धमकी देण्याऱ्या इसमाला अटक, कारण एकूण पोलिसही चक्रावले

नवी दिल्ली | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येची धामी दिल्याप्रकरणी एका २२ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे हा तरुण जामिनावर भर सुटला होता मात्र पुन्हा जेलमध्ये जाण्यासाठी त्याने फोन करुन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येची धमकी दिली. त्यांच्या या प्रकरणामुळे पोलिसही चक्रावले आहे. सदर इसमाचे नाव सलमान असे असल्याचे समोर येत आहे.

सलमानने पोलिसांना फोन करुन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येची धमकी दिली होती. आरोपीने पोलिसांना फोन करुन ‘मला मोदींची हत्या करायची आहे’ असं म्हटलं होतं. यानंतर पोलिसांना खजुरी खास परिसरातून त्याला अटक करुन चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणलं. यावेळी त्याने आपल्याला पुन्हा जेलमध्ये जायचं असल्याने धमकी दिल्याचं पोलिसांना सांगितलं.

पोलिसांनी चौकशी केली असताना सलमानविरोधात पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असल्याचं समोर आलं. आरोपीने आपण जेलमध्ये जाण्यासाठी धमकी दिल्याची कबुली दिली असली तरी पंतप्रधानांच्या सुरक्षेशी संबंधित मुद्दा असल्याने गुप्तचर यंत्रणेचे अधिकारीही त्याची चौकशी करणार आहेत. मात्र या घटनेमुळे पंतप्रधान मोदी यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Team Global News Marathi: