काँग्रेसच्या आक्षेपावर देवेंद्र फडणवीस संतापले “हा तर असंवेदनशीलतेचा कळस”

 

विधान परिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीसाठी २८५ आमदारांनी मतदान केले. त्यात भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक आजारी असताना मतदानाला आले. परंतु या दोन्ही आमदारांच्या मतदानावर काँग्रेसनं आक्षेप घेतला असून याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. त्यावर भाजपानेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

याबाबत भाजपा नेते संजय कुटे म्हणाले की, राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपा आणि महाविकास आघाडी दोघांनीही मतदानावर आक्षेप घेतले होते. या निवडणुकीत भाजपा आमदार लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक यांनी निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन मतदान केले होते. परिस्थिती बिकट असताना दोन्ही आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. परंतु महाविकास आघाडीने खालच्या पातळीचं राजकारण सुरू केले आहे. काँग्रेसनं या दोघांच्या मतदानावर आक्षेप घेतला ते दुर्देवी आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच काँग्रेसने घेतलेला आक्षेप निवडणूक अधिकारी १०० टक्के फेटाळेल असा दावाही संजय कुटे यांनी केला आहे. तर काँग्रेसनं घेतलेल्या आक्षेपावर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसनं असंवेदनशीलतेचा कळस गाठला अशी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र राज्यसभेला त्यांनी मतदान केले होते. विधान परिषदेत त्यांच्यामार्फत प्रतिनिधींकडून मतदान करण्यात आले. भाजपाने इतक्या त्रासातून त्यांना मतदानासाठी आणायला नव्हतं पाहिजे. त्यामुळे भाजपानं सहानुभूती दाखवायला हवी होती असं काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.

Team Global News Marathi: