नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करणारा ठराव बंगाल विधानसभेत मंजूर

 

पश्चिम बंगाल | बंगाल विधानसभेने सोमवारी भारतीय जनता पक्षाच्या माजी नेत्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करणारा ठराव मंजूर केला. शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध करणारा ठराव राज्य सरकारने मंजूर केल्यावर भाजप नेत्यांनी सभात्याग केला.

पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी आणि मुख्य व्हीप मनोज तिग्गा यांच्यासह भाजपच्या सात आमदारांचे निलंबन झाल्यानंतर अवघ्या चार दिवसांनी हे झाले आहे. आता निलंबन मागे घेण्यात आले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विधानसभेला संबोधित करत असताना सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली भाजप नेत्यांनी विरोध सुरू केला.

ममता बॅनर्जी म्हणाल्या, ‘राज्यात हिंसाचार झाला तेव्हा आम्ही कारवाई केली. पण या महिलेला (नुपूर शर्मा) अद्याप अटक कशी झाली नाही? मला माहित आहे की त्यांना अटक होणार नाही. त्यांनी कोलकाता पोलिसांकडे चार आठवड्यांचा वेळ मागितला आहे. आज पोलिसांसमोर हजर होणार होत्या.’नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यामुळे कोलकाता पोलिसांसमोर हजर राहण्यासाठी चार आठवड्यांची मुदतवाढ मागितली आहे.

Team Global News Marathi: