संजय राऊत यांच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी, तक्रारीमधील संबंधित तीन व्यक्तीचा नोंदवला जबाब

 

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषदेत भाजपवर गंभीर आरोप केले होते. तसेच काही अनाधिकृत कंपनी चालवत असल्याचा आरोप व यात घोटाळा होत असल्याचे गंभीर आरोप केले होते. यावेळी त्यांनी किरीट सोमय्या यांचा पूत्र निल सोमय्या, मोहित कंबोज यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले होते.

दरम्यान काल मुख्यमंत्री यांच्या मेव्हण्याच्या कंपनीवर तसेच घरी ईडीने धाड टाकत कोट्यवधीची संपत्ती जप्त केले आहे. त्यानंतर आता मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखा सुद्धा ॲक्शन मूडमध्ये आले आहे. मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखेकडून राऊत यांच्या तक्रारीवरून संबंधित तीन व्यक्तींचा जबाब नोंदवला असून, संबंधित कंपनीला नोटीस बजावली आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर भाजपाकडून कोणत्या प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

प्रकरण असे की मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे मेव्हणे आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी उद्धव ठाकरी त्यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्या 11 सदनिकांवर अंमलबजावणी संचनालयाने टाच आणली. या सदनिका सील केल्या असूनही त्याचे बाजारभावाने मुल्य सहा कोटी 45 लाख रुपये आहे. या कारवाईमुळे पुन्हा एकदा राज्य आणि केंद्र सरकारमधील संघर्ष तीव्र होण्याची शक्‍यता आहे.

Team Global News Marathi: