दिलासादायक: राज्यात कोरोना बधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त; मृत्यू संख्या ही घटली

महाराष्ट्रातील कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या आज पुन्हा कमी झाली. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी आणखी दिलासा देणारा ठरला. दिवसभरात कोरोना निदान झालेले २० हजार ७४० नवे रुग्ण आढळले. तर ३१ हजार  ६७१ रुग्ण बरे होऊन घरी परतले. विशेष म्हणजे राज्यातील सर्वच विभागांमध्ये नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. राज्यातील एकूण सक्रिय रुग्णसंख्याही तीन लाखाखाली पोहचली आहे.

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येची ठळक माहिती 

आज राज्यात २०,७४० नवीन रुग्णांचे निदान.

आज ३१,६७१ रुग्ण बरे होऊन घरी

राज्यात आजपर्यंत एकूण ५३,०७,८७४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.

राज्यात आज रोजी एकूण २,८९,०८८ सक्रिय रुग्ण आहेत.

यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९३.२४% एवढे झाले आहे.

राज्यात आज ४२४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. एकूण ४२४ मृत्यूंपैकी २९१ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १३३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.

सध्या राज्यातील मृत्यूदर १.६४% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,४३,५०,१८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५६,९२,९२० (१६.५७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात २१,५४,९७६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १६,०७८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

विभागवार रुग्णसंख्या

प. महाराष्ट्र ०८,९५६ (कालपेक्षा घट)

विदर्भ ०३,४२३ (कालपेक्षा वाढ)

महामुंबई ०३,०३३ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड) (कालपेक्षा घट)

उ. महाराष्ट्र ०२,३१२ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह) (कालपेक्षा घट)

मराठवाडा ०२,०६३ (कालपेक्षा घट)

कोकण ००,९५३ (सिंधुदुर्ग रत्नागिरी) (कालपेक्षा किंचित वाढ)

एकूण नवे रुग्ण २० हजार ७४०  (बुधवारपेक्षा ५३३ कमी)

महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण: 

आज राज्यात २०,७४० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५६,९२,९२० झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

१      मुंबई मनपा         ९२४

२      ठाणे               १९९

३      ठाणे मनपा   १५५

४      नवी मुंबई मनपा     ११४

५      कल्याण डोंबवली मनपा     १५६

६      उल्हासनगर मनपा   ४२

७      भिवंडी निजामपूर मनपा     १५

८      मीरा भाईंदर मनपा   १४९

९      पालघर ३८८

१०     वसईविरार मनपा    १८४

११     रायगड ५८७

१२     पनवेल मनपा १२०

ठाणे मंडळ एकूण    ३०३३

१३     नाशिक ३९६

१४     नाशिक मनपा ३०३

१५     मालेगाव मनपा      ३

१६     अहमदनगर   १११८

१७     अहमदनगर मनपा   ७५

१८     धुळे   ५६

१९     धुळे मनपा   ३८

२०     जळगाव      २५६

२१     जळगाव मनपा १५

२२     नंदूरबार      ५२

नाशिक मंडळ एकूण  २३१२

२३     पुणे   १४०६

२४     पुणे मनपा    ६०४

२५     पिंपरी चिंचवड मनपा ४९२

२६     सोलापूर      ८५५

२७     सोलापूर मनपा ३४

२८     सातारा २३९८

पुणे मंडळ एकूण     ५७८९

२९     कोल्हापूर     १४४६

३०     कोल्हापूर मनपा     ६१०

३१     सांगली ९६५

३२     सांगली मिरज कुपवाड मनपा १४६

३३     सिंधुदुर्ग      ४०४

३४     रत्नागिरी     ५४९

कोल्हापूर मंडळ एकूण ४१२०

३५     औरंगाबाद    ३४८

३६     औरंगाबाद मनपा     ११०

३७     जालना १७२

३८     हिंगोली ५५

३९     परभणी ७९

४०     परभणी मनपा १९

औरंगाबाद मंडळ एकूण      ७८३

४१     लातूर  १४१

४२     लातूर मनपा  ३८

४३     उस्मानाबाद   ३४७

४४     बीड   ६८४

४५     नांदेड  ५४

४६     नांदेड मनपा  १६

लातूर मंडळ एकूण   १२८०

४७     अकोला २०१

४८     अकोला मनपा १२२

४९     अमरावती     ६००

५०     अमरावती मनपा     ८२

५१     यवतमाळ     ५१०

५२     बुलढाणा      ५७३

५३     वाशिम ३३४

अकोला मंडळ एकूण  २४२२

५४     नागपूर १३९

५५     नागपूर मनपा २२५

५६     वर्धा   १८६

५७     भंडारा  १४८

५८     गोंदिया २६

५९     चंद्रपूर १४९

६०     चंद्रपूर मनपा  २५

६१     गडचिरोली    १०३

नागपूर एकूण १००१

एकूण  २०७४०

ग्लोबल न्युज नेटवर्क: