दिलासादायक ! राज्यात सोमवारी 71,736 जणांना डिस्चार्ज तर, 48,700 नवे रुग्ण

दिलासादायक ! राज्यात सोमवारी 71,736 जणांना डिस्चार्ज तर, 48,700 नवे रुग्ण

ग्लोबल न्यूज – राज्यात आज कोरोनाची दिलासादायक आकडेवारी समोर आली आहे. आज दिवसभरात 71 हजार 736 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, 48 हजार 700 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 43 लाख 43 हजार 727 वर जाऊन पोहोचली आहे. त्यापैकी 36 लाख 01 हजार 796 रुग्ण उपचाराअंती बरे झाले असून, राज्याचा रिकव्हरी रेट 82.92 टक्के एवढा झाला आहे. सध्या राज्यात 6 लाख 74 हजार 770 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज 524 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, आजवर एकूण 65 हजार 284 जण कोरोनामुक्त मुत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.50 टक्के एवढा आहे. सध्या राज्यात 39 लाख 78 हजार 420 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 30 हजार 398 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आतापर्यंत 2 कोटी 59 लाख 72 हजार 018 नमूने तपासण्यात आले आहेत.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: