राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंक्रयेत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठया प्रमाणात मागणी वदलेली असून राज्यात अल्पप्रमाणात केंद्र सरकारकडून पुरवठा केला जात आहे. त्यात आता नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा बाहेर विकल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या खासदार डॉ हिना गावित यांनी केला आहे. या आरोपांमुळे एकचं खळबळ उडाली आहे.
नंदुरबारच्या भाजप खासदार डॉ. हिना गावित यांनी अत्यंत गंभीर आरोप केला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील रुग्णालयात रेमडेसिवीर इंजेक्शन्सची गरज आहे. असं असताना जिल्हाधिकारी आणि रोटरी वेलनेस सेंटरने मिळून रेमडेसिवीरचा साठा बाहेर विकल्याचा खळबळजनक आरोप गावित यांनी केला आहे. ‘नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. दवाखान्यांमध्ये आज रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सची मोठी गरज भासत आहे. याच पार्श्वभूमीवर मी जिल्हाधिकाऱ्यांकडे वारंवार विनंती करून रेमडेसिवीर इंजेक्शनचे वाटप करण्याची विनंती केली होती. पण जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत कुठलाही निर्णय़ घेतला नाही.
मात्र शेवटी मी पत्रकार परिषद घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी फक्त ५०० इंजेक्शन दवाखान्यांना दिले. रोटरी वेलनेस सेंटरला १ हजार इंजेक्शन देण्यात आले होते. दवाखान्यांकडून माहिती घेतल्यानंतर त्यांना इंजेक्शन मिळाले नसल्याची माहिती समोर आली आहे. रोटरी वेलनेस सेंटरने हे इंजेक्शन बाहेरच्या बाहेर विकले. नंदुरबारचे जिल्हाधिकारी आणि माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी मिळून हे काम केल्याचा गंभीर आरोप हीना गावित यांनी केला आहे.
आज नंदुरबारमध्ये रेमेडिसीव्हीरची प्रचंड आवश्यकता आहे. असे असतानाही रोटरी वेलनेस सेंटरने रुग्णांना इंजेक्शन न देता ते बाहेर विकण्याचं काम केलं. दवाखान्यांना अजूनही इंजेक्शन देण्यात आले नाहीत. @IASRajBharud आणि चंद्रकांत रघुवंशी यांनी मिळून हा साठा बाहेर विकला आहे. @DrHeena_Gavit pic.twitter.com/ZUSN7LDpCz
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) April 22, 2021