मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात पुरपरिस्थितीची पाहणी करणार !

 

कोल्हापूर | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर असून ते आजकोल्हापुरातील पूरस्थितीची पाहणी करणार आहेत. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने यांनी कोल्हापूर विमानतळावर मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं. मुख्यमंत्री कालच कोल्हापूरला जाणार होते. मात्र हवामान विभागाने कोल्हापूरला पावसाचा रेड अलर्ट दिला होता. त्यामुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आला.

दरम्यान, उद्धव ठाकरे पहिल्यांदा कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी या गावाची पाहणी करणार आहेत. नृसिंहवाडी हे गाव आठवडाभरापासून पाण्यात आहे. पाऊस बंद झाला असला तरी पाणीपातळी अवघी दोन टक्के कमी झाली आहे. गावातील सर्व लोकांचे सुरक्षित स्थलांतर केले आहे. मात्र जनावरांचा चारा, लाईट पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. पाणी काही प्रमाणात ओसरलं असलं तरी कमरेएव्हढ्या पाण्यातून लोक घरापर्यंत पोहोचत आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहणी करुन योग्य मदत द्यावी, जाहीर केलेली तुटपुंजी दहा हजारांची मदत ही स्वच्छता आणि जेवणखाण्याला पुरेल ही मदत वाढवावी अशी मागणी पूरग्रस्तांनी केली आहे.

Team Global News Marathi: