सर्वांचे सामूहिक निलंबन करा, संतप्त एसटी कर्मचाऱ्यांचं परिवहन मंत्री अनिल परबांना विनंती

 

मुंबई | एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण कारणात यावे या मागणीसाठी मागच्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचारी आंदोलनाचा बडगा उचलताना दिसून येत आहे. त्यातच हे आंदोलन आता चिघळताना दिसून येत आहे. आजही एसटी कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम असून आंदोलनावर कुठलाही तोडगा निघत नाहीये तर दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे.

याच पार्श्वभूमीवर आता एसटी कर्मचाऱ्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना पत्र लिहून सर्वच कर्मचाऱ्यांचे सामूहिक निलंबन करण्याची मागणी केली आहे. आपल्या पत्रात एसटी कर्मचाऱ्यांनी म्हटलं, “आम्ही स्वारगेट आगार पुणे येथील सर्व कर्मचारी दिनांक 8 नोव्हेंबर 2021 पासून राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शसानात विलगीकरण करणेसाठी राज्यातील इतर सर्व आगारातील व इतर प्रशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांसोबत पुकारण्यात आलेल्या कामबंद आंदोलनात सहभागी आहोत.

पुढे त्या पत्रात लिहितात की, या संपूर्ण आंदोलनात आम्ही सर्व कामगारांनी एकमताने व सहमताने कामबंद / संप आंदोलन केले आहे. सदर आंदोलनामध्ये आम्ही सर्व कर्मचाऱ्यांचा तेवढाच व पुर्ण सहभाग व सदर कामबंद संपास आम्हीही तेवढेच जबाबदार असून जर आपल्याकडून निलंबनाची कार्यवाही होत असेल तर ही कार्यवाही आम्हा सर्व कर्मचाऱ्यांवर एकत्रितपणे करण्यात यावी.” आम्हा सर्व कर्मचाऱ्यांवर एकत्रितपणे निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी. जर निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांचे मानसिक दबावामध्ये स्वत:च्या जीवाचे काही बरे वाईट करुन घेतले तर त्यास प्रशासन सर्वस्वी जबाबदार असेल असंही एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

Team Global News Marathi: